Today : 14:08:2020


आल्लापल्ली पेसा निधी अफरातफर प्रकरण (पेसा बद्दल जागृत करणाऱ्यानेच पेसा निधीत केला घोळ) चौकशीत पुन्हा नाव समोर येण्याची शक्यता : संतोष चामे पोलीस उपनिरीक्षक अहेरी

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
तालुका प्रतिनिधी, अहेरी :- 
अहेरी तालुक्यातील आलापल्ली ग्राम पंचायत मध्ये पेसा निधी मधून ग्राम सेवकाने आपल्या पत्नीचा नावावर ८२,६५० रुपयाची उचल केली असून रिक्त चेक वर आलापल्ली येथील माजी सरपंचा रेणुका कुळमेथे, कोष समिती अध्यक्ष कैलाश कोरेत यांचे हस्ताक्षर होते. त्या अफरातफर प्रकरणी आलापल्ली येथील सेवा बजावलेल्या ग्रामसेवक मिलिंद शेंडे, माजी सरपंचा रेणुका कुळमेथे व कोष समिती अध्यक्ष कैलाश कोरेत यांच्या वर भादवी कलम ४२०, ३४, ४६८, ४६९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे कोष समिती अध्यक्ष हे गावा गावात जाऊन पेसा बद्दल नागरिकांना जागृत करण्याचे कामे करत होते. मात्र त्यांच्यावरच पेसा निधी अफरातफर प्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न जनते समोर निर्माण झाला आहे.
     तसेच पेसा निधी प्रकरणात आणखी काही नावे येईल अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरण अहेरी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे हे करीत आहेत.

          "पेसा निधी अफरातफर प्रकरणात पूर्णपणे चौकशी सुरू असून यामध्ये आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे." : संतोष चामे, प्रकरण तपास अधिकारी 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्य