Today : 15:08:2020


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने गोंडवाना विद्यापीठाच्‍या भूमी संपादनाकरिता ८९ कोटी ३ लक्ष रू. इतक्‍या निधीची तरतूद

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जि. प्रतिनिधी :-
चंद्रपूर - गडचिरोली या दोन जिल्‍हयांसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या गोंडवाना विद्यापीठाच्‍या भूमी संपादनाकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नुकत्‍याच झालेल्‍या विधीमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्‍यांद्वारे ८९ कोटी ३ लक्ष रू. इतक्‍या निधीची तरतूद करण्‍यात आली आहे.
     अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संसदीय संघर्षाच्‍या माध्‍यमातुन सन २०११ मध्‍ये चंद्रपूर - गडचिरोली या दोन जिल्‍हयांसाठी स्‍वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. या विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम दर्जाचे उच्‍च शिक्षण विद्यार्थ्‍याना मिळावे यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सातत्‍याने प्रयत्‍नशील आहेत. या विद्यापीठाच्‍या स्‍थापनेमागील उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांच्‍याकडे सुध्‍दा पाठपुरावा केला. २०१६ मध्‍ये राज्‍यपालांनी यासंबंधीचा अभ्‍यास करण्‍यासाठी ऑब्‍जर्व्‍हर रिसर्च फाऊंडेशनची नियुक्‍ती केली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विद्यापीठाला जागतीक दर्जाचे विद्यापीठ बनविण्‍यासाठी कोणकोणत्‍या उत्‍तम कल्‍पना राबविता येवू शकतील हे विचारात घेवून विद्यापीठाचा दृष्‍टीकोन व त्‍याची भविष्‍यातील वाटचाल दर्शविणारा सखोल अभ्‍यास करून यासंबंधीचा अहवाल सादर करण्‍यास फाऊंडेशनचे अध्‍यक्ष श्री. सुधींद्र कुलकर्णी यांना सांगीतले होते. फाऊंडेशनने काही महिन्‍यांपूर्वी आपला अहवाल शासनाला सादर केला. गोंडवाना विद्यापीठाची सद्यःस्थिती, विद्यापीठाची जागा, तेथील विद्यार्थ्‍यांच्‍या गरजा, आदिवासीबहुल लोकसंख्‍या, त्‍यांच्‍यासाठी पदवी आणि पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या सुविधा, कौशल्‍यविकास, भौगोलिक अंतरामुळे निर्माण होणा-या समस्‍या या सर्व गोष्‍टींचा साकल्‍याने विचार करून या अं‍तरिम अहवालात विविध शिफारशी करण्‍यात आल्‍या आहेत. 
     ऑब्‍जर्व्‍हर रिसर्च फाऊंडेशनच्‍या शिफारशींच्‍या अनुषंगाने शासनाने कार्यवाही सुरू केली असुन भूमी संपादनाकरिता पुरवणी मागण्‍यांद्वारे ८९ कोटी ०३ लक्ष रू.एवढी तरतूद करण्‍यात आली असुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने गोंडवाना विद्यापीठ सक्षम व उत्‍तम दर्जाचे विद्यापीठ होण्‍याच्‍या प्रक्रियेला चालना मिळाली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur