Today : 14:08:2020


सावित्रीबाई फुलेंनी दिला महिलांना शिक्षणाचा अधिकार : सरपंचा सरोज दुर्गे यांचे प्रतिपादन

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
ता. प्रतिनिधी :-
नागेपल्ली ग्राम पंचायत येथे ३ जानेवारी रोजी थोर समाजसेविका आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सरपंचा सरोज दुर्गे कार्यक्रम दरम्यान बोलत होते की, सावित्रीबाई फूलेच्या विचारांनी मला घडविले म्हणूनच मी आज समान हक्क घेऊन शिक्षित झालो आणि मला सरपंचा होण्याचा मान मिळाला आहे. सावित्रीबाई फुले स्त्रीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आधुनिक भारतातील पहिल्या महिला आहेत, म्हणूनच जगाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे. स्त्रियांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातून शिक्षण घेऊन समोरे जावे आणि आपला व आपल्या देशाचा नाव लौकिक करावे असे प्रतिपादन यावेळी सरपंचा सरोज दुर्गे यांनी केले.
     यावेळी कार्यक्रामाला उपस्थित राकेश तलांडे उपसभापती पंचायत समिती अहेरी, दिलीप वडलाकोंडवार, जाकीर सय्यद, ग्राम पंचायत सदस्य श्रीनिवास निकोडे, मल्लारेड्डी येमनूरवार, श्री मोहन खोब्रागडे, अनिल आलाम, पोलिस पाटील गणपत गुरनुले, संजय उईके, ज्योत्स्ना शानगोनंडावार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किशोर दुर्गे यांनी केली.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्य..