Today : 08:08:2020


ना. सुधीर मुनगंटीवार हा दिलेला शब्‍द पूर्ण करणारा लोकनेता – चंदनसिंह चंदेल

"मानोरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे भूमीपूजन संपन्‍न"
विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
ता. चंद्रपूर :-
विकासासंबंधी आजवर जो शब्‍द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्‍याने पूर्ण केला आहे म्‍हणूनच शब्‍दाला जागणारा नेता अशी त्‍यांची राज्‍यभर ख्‍याती आहे. बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय त्‍यांच्‍या पुढाकाराने घेण्‍यात आला. चंद्रपूर जिल्‍हयात आरोग्‍य सेवा बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने नेहमीच त्‍यांनी पुढाकार घेतला असुन रूग्‍णसेवा हीच ईश्‍वराची सेवा आहे असे समजून कार्य करणाऱ्या ना. मुनगंटीवार यांचा आम्‍हाला अभिमान असल्‍याचे प्रतिपादन महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष श्री.चंदनसिंह चंदेल यांनी केले. 
     दिनांक ५ जानेवारी रोजी बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा या गावात प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या भूमिपूजन कार्यक्रमात चंदनसिंह चंदेल बोलत होते. यावेळी बल्‍लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी होते. प्रमुख अतिथी या नात्‍याने भाजपाचे तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, बल्‍लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती राजू बुध्‍दलवार, जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ. वैशाली बुध्‍दलवार, हरीश गेडाम, पंचायत समितीच्‍या उपसभापती सौ. इंदिराताई पिपरे,  पंचायत समिती सदस्‍य सोमेश्‍वर पदमगिरीवार, सौ. विद्याताई गेडाम, इटोलीच्‍या सरपंच सौ. मंगला सातपुते आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. प्रा. आ. केंद्राचे भूमीपूजन चंदनसिंह चंदेल यांच्‍या हस्‍ते झाले. 
     यावेळी बोलताना चंदनसिंह चंदेल पुढे म्‍हणाले, ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापन करण्‍याबाबत नागरिकांना शब्‍द दिला होता. तो शब्‍द त्‍यांनी पूर्ण केला आहे. त्‍यांनी आरोग्‍य सेवेच्‍या बळकटीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सुमारे ५०० हून अधिक दिव्‍यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वितरण, ३५ हजार नागरिकांना चश्‍मे वितरण, ५ हजार नेत्ररूग्‍णांवर मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया यासह नुकतीच लाईफ लाईन एक्‍सप्रेस या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन रोगनिदान, उपचार व निःशुल्‍क शस्‍त्रक्रिया त्‍यांनी करविल्‍या. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय त्‍यांच्‍या प्रयत्‍नांनी सुरू झाले. सामान्‍य रूग्‍णालयासाठी नुकताच ९ कोटी रू. निधी त्‍यांनी मंजूर करविला. शिर्डी संस्‍थांन च्‍या माध्‍यमातुन एमआरआय मशीनसाठी ८ कोटी रू. निधी त्‍यांनी मंजूर करविला. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करविले. घुग्‍गुस, पडोली, बेंबाळ, चिचपल्‍ली, मुल, दुर्गापूर, धाबा, विसापूर, पोंभुर्णा, साखरवाही, नांदगाव पोडे, बल्‍लारपूर याठिकाणी रूग्‍णवाहीका त्‍यांनी उपलब्‍ध केल्‍या. टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने चंद्रपूर जिल्‍हयात कॅन्‍सर रूग्‍णालय उभारण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय नुकत्‍याच त्‍यांच्‍या पुढाकाराने घेण्‍यात आला आहे. हे कॅन्‍सर रूग्‍णालय वर्षभरात उभारण्‍यात येणार आहे. कोणत्‍याही गावात तापाची साथ आल्‍यास तातडीने त्‍याठिकाणी आरोग्‍य शिबीर आयोजीत करून नागरिकांना दिलासा देणारा हा नेता खऱ्या अर्थाने लोकनेता असल्‍याचे चंदनसिंह चंदेल यावेळी बोलताना म्‍हणाले. 
     यावेळी सौ. वैशाली बुध्‍दलवार, हरीश गेडाम, गोविंद पोडे आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन रमेश पिपरे यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


अहेरीत मुलभूत क्षमता प्रशिक्षण संपन्न.. (१८० शिक्षकांनी घेतला लाभ)

2018-01-08 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
जिल्हा श