Today : 14:08:2020


त्या शौचालयाच्या कामाला तडकाफडकी सुरूवात (वरिष्ठांकडुन चौकशीला कमालीचा उशीर)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
कोरपना तालुक्यातील गडचांदुर नगर परिषद हद्दीत येणाऱ्या वार्ड क्रमांक ६ माधव मसनाजी वाघमारे यांना घरकुल मंजुर करून खड्डा खोदण्यात आला, मात्र कोणताही बांधकाम न करता शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन सदर लाभार्थ्याच्या बॅक खात्यात दोन वेळा सहा, सहा अशी १२ हजाराची रक्कम जमा करण्यात आली. यानंतर नगर परिषद कर्मचारी प्रमोद वाघमारे यांनी ठेकेदाराला पैसे द्यायचे आहे असे सांगुन लाभार्थी मसनाजी वाघमारे यांच्या कडुन १० सप्टेंबर २०१७ रोजी रक्कम परत घेतली. असा लेखी तक्रारीत मसराम वाघमारे यांनी म्हटले आहे. मात्र पैसे घेऊन सुद्धा तीन महिन्या पासुन शौचालयाच्या कामा विषयी काहीच हालचाली दिसत नसल्याने लाभार्थी वाघमारे यांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी न.प. मुख्याधिकारी व नगराध्यक्षाला निवेदन देऊन काम सुरू करण्याची विनंती केली तसेच अनेक वेळा कर्मचारी प्रमोद वाघमारे यांना भेटुन सुद्धा या विषयी विचारणा केली परंतु प्रत्येक वेळी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.
     शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन न.प.कर्मचारी प्रमोद वाघमारे यांनी पैश्याची अफरातफर केल्याचा आरोप होत असुन शौचालय बांधकामाची निधी लाभार्थ्याच्या बॅक खात्यात तिन टप्प्यात जमा करण्याची तरतूद आहे. मात्र या ठिकाणी असे न करता निव्वळ खड्डा खोदुन दोनदा सहा, सहा हजार जमा करण्यात आले. व या नंतर परत घेतले हा प्रकरण चौहाट्यावर आणल्या नंतर तडकाफडकी  मसनाजी वाघमारेंना नगर परिषद येथे बोलावुन विश्वासात घेण्यात आले व शौचालयाचे काम पुर्वीच झाले असे पत्रात नमुद करुन सही करायला सांगीतले. मात्र आगोदर शौचालय बांधा नंतर सही करतो अशी भुमिका यांनी घेतल्याची माहिती असून हे प्रकरण फसवणुकीचे नाही का ? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे. जर मसराम वाघमारेंनी त्या कागदावर सही केली असती तर " तो मी नव्हेच " अशी भुमीका संबंधिताने घेतली असती यात काही शंका नाही.
    शहरात बांधण्यात आलेल्या सर्व शौचालयाची चौकशी होने अत्यंत गरजेचे आहे परंतु या संबंधी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागला पत्रा द्वारे चौकशीची मागणी संतोष पटकोटवारांनी केली मात्र अजुन पर्यंत या विषयी काहीच होताना दिसत नसल्याचे पाहुन वरिष्ठ या गंभिर प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न तर करित नाही ना अशी चर्चा शहरात सुरू आहे. लवकरात लवकर चौकशी करून सत्यता जगा पुढे आणावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli

" जखमी जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३ रा.अहेरी असुन त्याला नागपूर मध्ये हलविन्यात आले "