Today : 04:08:2020


महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास मंडळ गडचांदूर तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
गडचांदुर महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास मंडळ तर्फे आयोजीत आद्यशिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या १८७ वि जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. उदघाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण काकडे तर अध्यक्ष म्हणून बंडुभाऊ वैरागडे यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प माळा अर्पण करून महारॅली ची सुरुवात करण्यात आली. 
     तसेच हि भव्य रॅली ज्योतिबा फुले चौक पासुन सुरू झाली. बसस्थानक व गांधी चौक मार्गे परत फुले चौकात रैलीचे समापन झाले. या महारॅलीत महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई यांनी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली त्या शाळेतील देखावा, सावित्रीआई आणि महात्मा जोतिबा फुले यांची प्रतिमा रॅलीचे भव्य आकर्षण ठरले. महिला व पुरुषांनी बेटी बचाव,जल है तो कल है, शौचालयाचा वापर करा अशा प्रकारचे घोषणा फलक महिला व पुरूषांनी घेऊन महारॅलीची शोभा वाढवली. रॅली महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे संपल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष रवि शेंडे यांच्याकडून समाज बांधवांना महाप्रसाद देण्यात आले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गणेश आदे, सुनंदा सोनुले, संजय निकोडे, अनिल शेंडे, अजय गुरनुले, लक्ष्मण आदे, आकाश मादाडे, शंकर शेंडे, महेश राजूरकर, अमित कोरे, संतोष महाडोळे, सचिन सोनुले, अमोल आदे, विनोद बोरुले, दिलीप नागोसे, रेखाबाई गुरनुले, विमल चौधरी, किरण शेंडे, कविता शेडे, लताबाई शेंडे, राजेश्री मादाडे, पत्रुजि गुरूनुले यांनी अथक परिश्रम घेतले.
   कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ 3 जानेवारी रोजी गडचांदुर शहर पूर्णत: बंद असताना ठाणेदार विनोद रोकडे यांच्या पोलीस बंदोबस्तात महारॅली काढण्यात आली त्यावेळी पोलिस विभागाने केलेल्या सहकार्या बद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यासह समाज बांधवांनी आभार व्यक्त केले आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli














































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur