Today : 07:08:2020


शरिराच्या तंदुरुस्तीसाठी कबड्डी व इतर खेळ खेळणे गरजेचे - आ.किर्तीकुमार भांगडीया

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
आधुनिक धकाधकीच्या जीवनात माणूस शरिराकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो कबड्डी खेळातून शरिराला भरपूर व्यायाम मिळतो व शरिर स्वस्त राहते, म्हणूनच त्यासाठी शरिराच्या तंदुरुस्तीकरीता कबड्डी सामने भरविणे व खेळणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले. ते चिमूर विधानसभा मतदासंघातील सोनेगाव (वन) येथे आयोजीत कबड्डी सामन्यांचे उद्घघाटन प्रसंगी बोलत होते.
     उदघाटन प्रसंगी संबोधीत करतांना आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने  ग्रामसभेला खूप अधिकार दिले आहेत. ग्रामस्थांनी प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहून गावातील विविध समस्या सांगावे व त्यावर उपाय योजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना द्याव्यात. शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन प्रत्येक योजनेचा ग्रामपंचायतीमार्फत लाभ घ्यावा .समाजमंदिराचे बांधकाम, बोरवेल तसेच येथील विविध कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. माना समाजाच्या व्यालीडिटीचा विषय रेटून लावू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. नववर्षाच्या शुभेच्छा देत कबड्डी सामन्याच्या आयोजकांचे त्यांनी  कौतुक केले.
     यावेळी भाजपा जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूरकर, अजहर शेख, विनोद चोखरे, एकनाथ थुटे, मनीष नाईक, हेमलता नन्नावरे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-