Today : 22:11:2019


टॉवर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसावले आमदार किर्तीकुमार भांगडीया तहसील कार्यालयात झाली टॉवर ग्रस्त शेतकऱ्यांची सभा

प्रतिनिधी, चिमूर :- चिमूर तालुक्यातील १२५ टॉवर जात असलेल्या शेतकऱ्यांची यादी करून किती जमीन जाते त्यावर शासकीय प्रति हेक्टर दर नुसार मोबदला देण्यात यावा त्यासाठी कंपनी ने आठ दिवस काम बंद ठेवावे असे सांगत आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमीन वरील विविध पिक नुसार जिल्हा कृषी अधिकारी, चंद्रपूर मार्फतीनेच दर काढण्यात येईल. शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकरी, मजूरावर अन्याय करु नये २७  नोव्हेबर च्या सभेनंतरच पुढची दिशा ठरविण्यात येईल तो पर्यत टॉवर बांधकाम बंद ठेवण्याची सूचना केली राजनांंदगाव वरोरा ट्रांसफार्मसन अहमदाबाद कडून टॉवरचे काम चालू असताना टॉवर कंपनीकडून शासन अधिकृत जी.आर. नुसार मोबदला दिला जात नसल्याने अन्यायग्रस्त शेतकरी यांचेवर अन्याय होत आहे. 
     यासाठी शेतकरी संघटीत होऊन त्यांंनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात आली तरीही कंपनीची अरेरावी असून पोलीस सुरक्षा घेऊन शेतकऱ्यांना  पोलिसांच्या स्वाधीन करून दबंगगिरीने काम चालू आहे याची आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दखल घेत शेतकऱ्यांचे हित जोपासून तहसील कार्यालयात सभा घेण्यात आली.
     यावेळी कंपनी ने विश्वासात घेऊन काम करावे व जमीन अधिग्रहण कायद्यानुसार शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांवर तानाशाही करु नये तसेच विलास डांगे म्हणाले कि, प्रत्येक शेतकऱ्यांचे करार नामे करून च काम सुरु करावे ज्यांचे शेतात टॉवर उभे झाले त्यांनाही करारनामा करून शासकीय मोबदला देण्यात यावा.
     यावेळी आमदार किर्तीकुमार भांगडीया, भाजप तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविन परदेशी, तहसीलदार संजय नागतीळक, भिसी अप्पर तहसीलदार रावळे, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, शिवसेना माजी जि.प.सदस्य विलास डांगे, किशोर मुंगले, बकाराम मालोदे, ठाणेदार दिनेश लबडे ,पि एस आय, चहांंदे,  शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंग वर्मा व टॉवरग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्