Today : 09:08:2020


कुरंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे (गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
आरमोरी, दिलीप घोडाम :- 
आरमोरी तालुक्यातील कुरंडी माल येथे परिसरातील लोकसंख्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आली. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ कुकरेजा सेवा निवृत्ती झाल्यानंतर प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने पथकातील कर्मचारी रामभरोसे सुरू असल्याने दिसून येत आहे. यात कुठल्याही प्रकारची रुग्णांची सोय होत नाही आहे. या बाबतच्या गंभीर अवस्था बाबत गावकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याकडे व्यक्त केली. 
     गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व आदिवासी भाग असल्याने शासनाकडून रुग्णांना जवळच आरोग्य सोय व्हावी म्हणून १० किलोमीटर अंतरावर आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आली. यात तालुक्यातील कुरंडी माल गावात प्राथमिक आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आली. यात १ वैद्यकीय अधिकारी परिचारिका, परिचर, स्विपर असे काही पदे भरण्यात आली होती. परंतु काही वर्षांपासून डॉ कुकरेजा सेवा निवृत्त झाल्याने पूर्णतः जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्ती न केल्याने या परिसरातील रुग्णांना कुरंडी येथील रुग्णालयात व्यवस्था नसल्याने आरमोरी, गडचिरोली येथे भरतीसाठी जावे लागत आहे. सध्या स्थितीत रुग्णालयात १ परिचारिका कंपाउंडर परिचर यांच्या अवलंबून सुरू आहे. शासन आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य केंद्र, आरोग्य पथक, रूग्णालय येथे उदासीनता दाखवीत असून रुग्णांच्या जीवाचे खेल करीत आहे. असे गावकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या समोर व्यक्त केले व तसेच ८ दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गावकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या समोर दिला आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद