Today : 14:08:2020


मुलचेरा येथे पत्रकार दिनानिमित्य सत्कार सोहळा.. लोक प्रतिनिधींकडून पत्रकारांचा सत्कार

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा :- पत्रकार दिनानिमित्य आज ०६ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधीनीकडून स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.रंजित मंडल सर नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालय मुलचेरा, प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष आत्राम अध्यक्ष नगर पंचायत मुलचेरा, सौ.सुवर्णाताई येमुलवार सभापती पंचायत समिती मुलचेरा, सौ.ममता बिश्वास सरपंचा, ग्रामपंचायत विवेकानंदपुर, विशेष अतिथी म्हणून रंजित स्वर्णकार, तालुका अध्यक्ष राका पार्टी, प्रकाश दत्ता तालुका अध्यक्ष भाजपा, देवा चौधरी उपाध्यक्ष नगर पंचायत मुलचेरा,हरिपद पांडे सरपंच गोविंदपूर, दीपक परचाके नगर सेवक, विद्युत मंडल सामाजिक कार्यकर्ते, उमेश पेळूरकर नगर सेवक, विमल बाला सामाजिक कार्यकर्ते,मनोज बंडावार उप सरपंच कोठारी, अब्दुल लतीफ शेख प्राचार्य, निखिल ईज्जतदार उप सरपंच सुंदरनगर, अपूर्व मुजुमदार सामाजिक कार्यकर्ते, सुभाष गणपती माजी पंचायत समिती, प्रामुख्याने उपस्थित होते.
       यावेळी मान्यवरांकडून दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रवींद्र शहा यांनी समाजात पत्रकार कसे महत्वाचे आहेत याबाबत बोलताना आपल्या प्रत्येक कार्यक्रम असो अथवा कुठलीही घटना असो अगदी वेळेवर समाजापुढे उत्तमरीत्या मांढणारे आपले पत्रकार बंधू आहेत त्यांचा मुळेच कुठे काय घडत आहे याबाबत जगाला माहिती मिळते. मग समाजासाठी दिवसरात्र अथोनाथ धावफड करणारे आपले पत्रकार बंधूंचा आज  दिवस असल्यामुळे त्यांचा सत्कार का करण्यात येऊ नये त्यामुळे मनात ही संकल्पना आली आणि आज सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. 
     युधिष्टिर बिश्वास यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलचेरा तालुक्याचा विकासात पत्रकार बंधूंचा विशेष सहकार्य असून यापुढेही विकासात्मक सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. यावेळी तालुका पत्रकार संघटनेच्या 10 पत्रकार बंधूंचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले लगेच पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा सर्वाना लेखणी आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी सहा.पोलीस निरीक्षक श्री मिलिंद पाठक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वाना अल्पोउपहाची ही व्यवस्था करण्यात आली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन आंबोरे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक ग्रामपंचायत कोठारी यांनी केले तर आभार पोलीस उप निरीक्षक डी. एस.मोरे यांनी मानले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक