Today : 05:06:2020


अहेरी तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दिपक सुनतकर :-
अहेरी तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित झाली असुन अध्यक्षपदी प्रतीक मुधोळकर तर सचिव पदी रंगय्या रेपाकवार यांची निवड झाली आहे. अहेरी तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी येथील जिल्हा परिषदेच्या विश्राम गृहात नुकतीच गठीत करण्यात आली. कार्यकारणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र अलोणे हे होते. तर यावेळी प्रतीक मुधोळकर यांची अहेरी तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी व सचिव म्हणून रंगय्या रेपाकवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
     कार्यकारणीच्या उपाध्यक्षपदी प्रकाश दुर्गे, कोषाध्यक्ष सुधाकर उमरगुंडावार, सहसचिव दिपक सूनतकर तर सदस्यपदी विवेक बेझलवार, गिरीश मद्देरलावार, सुरेंद्र अलोने, किशोर बुरबुरे, ए.आर.खान, मेहबूब अली, निसार सय्यद, दशरथ सूनतकर, प्रशांत नामनवार, यांची निवड करण्यात आली. 
     यावेळी पत्रकार संघटन, पत्रकार भवन आणि अन्य विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि मावळते अध्यक्ष गिरीश मद्देरलावार, प्रकाश दुर्गे, विवेक बेझलवार यांचे व नव्याने पदभार स्विकाणारे प्रतीक मुधोळकर, रंगय्या रेपाकवार यांचे पुष्पगुच्छ देवून संघटनेच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-06


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur