Today : 04:08:2020


माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य रोगनिदान शिबीर तथा कार्यकर्ता मेळावा

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे आज ०७ जानेवारी २०१८ रोजी रविवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोफत भव्य रोगनिदान शिबीर व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. एटापल्ली तालुक्यातील समस्त गोर-गरीब आणि गरजू लोकांनी मेळाव्याला उपस्थित राहून या शिबिराचे लाभ घ्यावे अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक तथा राका चे एटापल्ली तालुका अध्यक्ष मा.दौलतभाऊ दहागावकर यांनी केले आहे.
     या शिबिरात मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप, नवीन पॅन कार्ड, आधारकार्ड तसेच विविध कागदपत्र वाटप होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.धर्मरावबाबा आत्राम माजी राज्यमंत्री यांचे मार्गदर्शन या प्रसंगी होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ.भाग्यश्रीताई हलगेकर बांधकाम सभापती जि. प.गडचिरोली आणि प्रमुख पाहुणे म्हणून मा.बेबीताई लेकामी सभापती पंचायत समिती एटापल्ली उपस्थित राहणार असून पहिल्यांदाच अतिदुर्गम भागात मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन होत असून समस्त तालुक्यातील ग्रामिणांना या रोगनिदान शिबिराचा लाभ घेण्याचे विनंती समस्त एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्