Today : 14:08:2020


पात्र कत्रांटदाराला डावलून अपात्र कंत्राटदाराला निविदा मंजूर करणे ग्रामपंचायतीला भोवणार ! (ग्रा.प.सचिव, सरपंच,उपसरपंच व बारा सदस्यावर चौकशी अधिकाऱ्याचा ठपका)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुद्धारपवार :-
ग्रामपंचायत कार्यालय नवरगाव कडून साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आले, यामध्ये सहा कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या त्यामधील दोन निविदा त्रुटीमुळे नाकारण्यात (नियमबाह्य) आल्या मात्र नाकारलेल्या व्यक्तीलाच पुन्हा साहित्य पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. तसेच विकास कामास पारदर्शकता यावी यासाठी शासनाने ई निविदा प्रक्रिया सुरु केली असून नवरगाव ग्रामपंचायतीने ई निविदा मागीतल्या त्यामध्ये मुकेश मार्केटिंग, महेंद्र ट्रेडिंग, मयूर बोडने, अनिल बोरकर, अण्णाजी बिल्डिंग व सुशांत बोडने यांनी निविदा सादर केल्या होत्या. 
     तसेच ग्रामपंचायत कडून ३ नोव्हेंबर २०१७ ला उघडण्यात आल्या. यामध्ये मुकेश मार्केटिंग यांनी रजिस्ट्रेशन कॉपी जोडलेली नव्हती तर सुशांत बोडणे यांचे जि.एस.टी. व इन्कमटॅक्स बाबतीचे दस्तऐवज पाहण्यात आले नसल्याने दोघांना निविदेतून बाद करण्यात आल्याची बाब त्यांनी पत्रकार परिषदेतून समोर आली होती. यामध्ये अतिरिक्त चार कंत्राटदाराकडून ज्यांचे दर कमी असलेल्या कंत्राटदारांना निविदा मंजूर व्हायला पाहिजे होती. यामध्ये एल १  प्रमाणे सर्वात कमी दर असलेल्या महिंद्रा ट्रेडींगला काम मिळाला पाहिजे होते. मात्र ग्रामपंचायत स्तरावरून त्यांना वगळून ज्यांची निविदा फेटाळली होती अशा  व्यक्तीला नियमबाह्य करण्यात आली होती. अशा व्यक्तीची पुन्हा निविदा कशी मंजूर झाली ? असा प्रश्न पत्रकार परिषदे मध्ये महेंद्र कामडी यांनी उपस्थित केला होता.
     तत्पुर्वी महेंद्र कामडी यांनी संवर्ग विकास अधिकारी प.स. सिंदेवाही यांच्याकडे १० नोव्हेंबर २०१७ ला लेखी तक्रार केली होती व याबरोबरच जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर, अध्यक्ष जि.प., आ.किर्तीकुमार भांगडिया यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.पंचायत स्तरावरून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता या निविदेवर न्यायालयाचा स्टे (स्थगिती) मिळाल्याचे  प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले आहे. या प्रकरणाचा निर्णय काय लागतो याकडे नवरगाव वासियांचे लक्ष लागले असतांना पंचायत समिती स्तरावरून विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून चौकशी अहवाल बनविला त्यात त्यांनी जी निविदा मंजूर केली चूकीची असल्याचे म्हणत ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच आणि बारा ग्रा.प. सदस्य यांचेवर ठपका ठेवण्यात आला असून ग्रा.प. अधिनियमानुसार दोषी असल्याचे चौकशी अहवालातील अभिप्रायात नमूद केले आहे. त्यामुळे निविदा प्रकरण ग्रामपंचायतीला भोवणार असल्याचे दिसून येत आहे. 
          "संवर्गविकास अधिकारी इल्लूरवार यानी प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले कि, विस्तार अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला असून जिल्हा परिषद मुख्यकार्यपालन अधिकारी यांचे कडे पाठविला असून त्यांच्या निर्णयानुसार कार्यवाहीची पुढील दिशा ठरणार आहे."
News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
निकृष्ट बांधकाम पुन्हा उत्कृष्ट करणेसाठी झोपा क़ाढा (ठिय्या) आंदोलन

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मूल
, दीपक देशपांडे :-  नगर परिषद मूल क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये सोमनाथ मार्गाव