Today : 14:08:2020


विद्यार्थी व्यसनापासून दूर राहावे : पोलीस निरीक्षक योगेश घारे

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
कुरखेडा, किशोर कराडे :-
विद्यार्थी व्यसनापासून दूर राहावे व्यसनाधीनने जिवनाच्या अपघाताला सुरुवात होते. विद्यार्थी या देशाचे भवितव्य आहे त्यांनी नियमित अभ्यासासह शिस्त व मैदानी खेळांनी जीवनात स्थान द्यावे व यशस्वी जबाबदार नागरिक म्हणून नावलौकिक करावा असे आव्हान कुरखेडा पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी कुरखेडा येथील आयोजीत सुमन सुद्धा बक्षिस वितरण सोहळ्या मध्ये अध्यक्ष मार्गदर्शनात बोलत होते.    
     विकास विद्यालय कुरखेडा येथे सुमन सुधा या तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल समारोप व बक्षिस वितरण समारंभाचा अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक घारे बोलत होते यावेळी मंचावर बक्षिस विरक व प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी उईके, उपाध्यक्ष मुझ्झफर अब्दुल बारी, सचिव उल्हास महाजन, मुख्याध्यापक बी.एम.शेंडे, माजी ग्राम पंचायत सदस्य सिराज पठाण व आदी उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले कि, कुरखेडा पोलीस स्टेशनचा वतीने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात एक तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना समाज कंठकातून काही त्रास होत असेल किंवा ते राहत असलेल्या गावात वार्डात अवैध व्यावसायिकांच्या व्यवसायाने गाव, समाज स्वास्थ बिघडत असेल, अश्यावेळी विद्यार्थी पालक तक्रार करण्यात घाबरतात. या सुविधेने विद्यार्थ्यांना या तक्रार पेटीट कागदावर तक्रार करावी त्यांच्या नावानी गुप्तता पाळण्यात येईल व पोलिसांना सुद्धा या अवैध कामावर आळा घालणे वेळेवर शक्य होईल असे यावेळी म्हणाले.
     कार्यक्रमात विविध स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष कामगिरी बजाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास महाजन संचालन सहाय्यक शिक्षक गणवीर व आभार शिक्षक मुकेश खोब्रागडे यांनी केले. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टा