Today : 08:08:2020


आदर्श महाविद्यालयाच्या विशेष रासेयो शिबिराचे उद्घाटन संपन्न (विद्यार्थ्यांनी विद्यार्जनामध्ये प्रामाणिकता जोपासावी - न्यायाधिश मा. सिंघेल)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
देसाईगंज, प्रतिनिधी :-
" केवळ पदवी संपादन करणे हेच शिक्षित होण्याचे ध्योतक नसून स्त्री-पुरुष व बालकांचा आदर करणारा प्रत्येक व्यक्ती हा जन्मजात शिक्षित समजला पाहिजे. कोणत्या एका शाखेतील शिक्षण श्रेष्ठ तर दुसऱ्या शाखेतील कनिष्ठ असा भेद न करता सर्वच शाखांतील ज्ञान सारखेच महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी विद्यार्जनामध्ये प्रामाणिकता जोपासली तर ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. स्वातंत्र्योत्तर काळात समाजासमाजातील विघटन हे विकासातील अडसर असून भारतीय संविधानाला अपेक्षित सर्वांचा समान विकास व्हावा यासाठी संविधानाला अपेक्षित जीवन प्रत्येक भारतीयाने जगले पाहिजे. आपण मनुष्य आहोत हे आपण शिकले पाहिजे." असे अमूल्य मार्गदर्शन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधिश मा. सिंघेल यांनी केले. नु.शि.प्र.व्दारे संचालित आदर्श महाविद्यालया अंतर्गत रासेयो द्वारा दत्तकग्राम आमगाव येथे "स्वच्छ भारत अभियानाकरिता युवक व श्रमसंस्कार" विशेष रासेयो शिबिराचे विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अनेक नैतिक कथांचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांना चांगला माणूस बनण्याचा सल्ला दिला. मात्र आज शिक्षणाचा स्तर खुपच खालावल्याबद्दल खंतही व्यक्त केली.
     संस्थाध्यक्ष मा. डॉ. निर्मलसिंगजी टुटेजा यांचे अध्यक्षतेखाली या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मा. व्ह. एस. मेश्राम यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. मोतीलालजी कुकरेजा, उपाध्यक्ष मा. जगदीशजी शर्मा, सहसचिव मा. सुनीलभाऊ नागतोडे, कोषाध्यक्ष मा. मुर्लीधरजी दुफारे, जेष्ठ सदस्य व शाळा समितीचे अध्यक्ष मा. केवळरामजी घोरमोडे, सरपंच मा. योगेश नागतोडे, प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी, माजी जि. प. सदस्य वसंतराव ठाकरे, मेरी विल्सन, सरकारी वकील अँड. खुणे, तालुका विधी समिती अध्यक्ष अँड. वारजुरकर, अँड पिलारे, अँड. गुरू, उपसरपंच अनिल निकम, पो. पाटील सौ. बोदेले, माजी सरपंच अरुणाताई दोनाडकर, विनोदजी दोनाडकर व शिबीर प्रमुख प्रा. रमेश धोटे  प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 
"कार्य करण्यामागचा हेतू महत्वाचा असतो, सेवा अनेक प्रकाराने करता येते. विद्यार्थी अवस्थेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकिची भावना वृध्दींगत होवून त्यातूनच त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व विकसित व्हावे" असे मार्गदर्शन आपल्या उद्घाटनपर भाषणात मान. व्ही. एस. मेश्राम यांनी केले. "स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासुन होते व रोग होऊ देण्यापेक्षा तो टाळणेच अधिक फायद्याचे असते" असे बोलून मान. डॉ. निर्मलसिंगजी टुटेजा यांनी शिबीरार्थ्यांना शिबीर यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्यात. अँड. वारजुरकर व अँड. खुणे यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली.
     श्रम कोणत्याही प्रकारचे असो त्याला मुल्य व प्रतिष्ठा असते. हे श्रम मुल्य युवक - युवतींमध्ये रुजविणे ही विशेष शिबीराची उपलब्धी होय असे विचार प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून शिबीर प्रमुख प्रा. आर. एम. धोटे यांनी शिबीर आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. निहार बोदेले यांनी केले तर अतिथींचे व उपस्थितांचे आभार प्रा. निलेश हलामी यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमखची सांगता झाली.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliअहेरीत पत्रकार दिन साजरा (उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप)

2018-01-08 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स