Today : 07:08:2020


बल्लारशाह-भूसावळ ट्रेन गडचांदुर पासून सूरू करा (शिष्ट मंडळा द्वारे रेल्वे मंत्र्यांना निवेदन)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
बल्लारशाह वरून सुटणारी भुसावळ देवली या पॅसेंजर ट्रेनला गडचांदुर वरून सुरू करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात कोरपना तालुका भाजपच्या शिष्ट मंडळाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना निवेदना द्वारे केली आहे. मात्र ही मागणी अनेक वर्षा पासून सुरू असून सरकार याकडे लक्ष देत नसल्याने अनेक नागरिकांना मोठा आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. औद्योगिक शहराच्या नावाने ओळखल्या जाणारा कोरपना तालुक्यातील गडचांदुर या शहराची लोकसंख्या अंदाजे ४० हजाराच्या घरात असून परिसरात अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड, मुर्ली अॅग्रो हे अंतराष्ट्रीय दर्ज्याचे सिमेंट प्रकल्प तसेच कोळसा खदान आहे. 
     विविध प्रांताचे कामगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून स्वगावी जाण्यासाठी गडचांदुर वरून ४० कि.मि.अंतरावर असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्टेशन वरून ट्रेन पकडावी लागते. स्थानीक पातळी वरून रेल्वेची सुविधा झाल्यास यांच्यासह इतरांना सोयीचे होईल. जिवती तालुका व तेलंगाना सिमा लगतच्या लोकांना ७० किमीचे अंतर कापुन बल्लारशाह येथे जावे लागतात. दोघांच्या मध्यभागी असलेल्या गडचांदुरच्या ठिकानी रेल्वेची व्यवस्था झाल्यास सर्व समस्या सुटतील. ही बाब लक्षात घेऊन बल्लारशाह वरून सुटणारी भुसावळ देवली पॅसेंजर ट्रेन गडचांदुरातील सर्व सुविधा प्राप्त व सुसज्ज रेल्वे स्टेशन वरून सोडण्यात यावी अशी मागणी गडचांदुर भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार, तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच नारायण हिवरकर, सतीश दांडगे, हरीश घोरे, माधव जयस्वाल, प्रल्हाद पवार, पुरूषोत्तम भोंगळे, महादेव एकरे, अरुण मडावी, रामसेवक मोरे, महेश घरोटे, दिनेश सुर, शंकर आसुटकर या शिष्ट मंडळा द्वारे करण्यात आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-