Today : 08:08:2020


अहेरीत मुलभूत क्षमता प्रशिक्षण संपन्न.. (१८० शिक्षकांनी घेतला लाभ)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक शिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग गडचिरोली व्दारा आयोजीत भाषा विषयाचे मुलभूत क्षमता वाचन विकसन प्रशिक्षण नवबौध्द निवासी आश्रम शाळा वांगेपल्ली (अहेरी) येथे तीन टप्यात आयोजीत करण्यात आले होते. राज्य स्तरावरुन प्रशिक्षण घेऊन आलेले विषय साधन व्यक्ती कु. सुषमा खराबे, शिक्षक विश्वनाथ वेलादी, संजय शेळकी, गणेश सुर्तेकर यांनी प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून प्रशिक्षण दिले.
     राज्याचे प्रधान शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी स्वत: व तज्ञाचे मदतीने भाषा विषयात विद्यार्थीना मुलभुत क्षमता विकसीत होण्याचे दृष्टीने हे  प्रशिक्षण शिक्षका करीता कसे परिणामकारक होईल याचा पुर्ण विचार केला आहे. बोली भाषेतून प्रमाण भाषा विद्यार्थ्यांना सुलभपणे कसे शिकविता येईल हा या प्रशिक्षणाचा मुळ गाभा आहे. विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पुर्ण करतो पण त्याला साधे वाचता व लिहीता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वच मुलांना वाचता व लिहीता यावे या करीता हे प्रशिक्षण रंजकपणे स्वत:च्या कृतीतून व विविध शैक्षणिक साहित्याव्दारे शिक्षकांनी घेतले आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिण्यात वर्गातील विद्यार्थीना शिक्षक धडे देतील व एप्रिल महिन्यात विद्यार्थीनी वाचन लेखन केले पाहिजे. या प्रशिक्षणातून नव्वद दिवसात विद्यार्थी हे शंभर टक्के वाचन लेखन करु शकतात असा शिक्षण तज्ञाचा दावा आहे. एप्रील मध्ये विद्यार्थीचे तंत्रशुध्द पध्दतीने मुल्यांकण केले जाणार आहे. या प्रशिक्षणाला प्रति शिक्षक तिनशे रुपयाची तरतूद केली आहे.
          "अहेरी तालुक्यातील आलापल्ली, जिमलगट्टा व अहेरी बीटातील इयत्ता पहिली ते पाचवीला भाषा विषय शिकविणारे एकशे साठ शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षण स्थळाला डायट संस्थेचे प्राचार्य डाॅ शरदचंद्र पाटील, जेष्ठ अधिव्याख्याता पांडुरंग चव्हाण, अनील जाधव, मिलिंद अघोर, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे यांनी भेट दिली. प्रशिक्षणस्थळी व्यवस्था उत्तम करण्यात आली होती."
News - Gadchiroli | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर