Today : 15:08:2020


निकृष्ट बांधकाम पुन्हा उत्कृष्ट करणेसाठी झोपा क़ाढा (ठिय्या) आंदोलन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मूल
, दीपक देशपांडे :-  नगर परिषद मूल क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये सोमनाथ मार्गावर केलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसात लोकांच्या घरात पाणी साचले होते. तेव्हा फोन करून सदर ठेकेदार व बांधकाम विभागात नगरसेवक विनोद कामडे यांनी कळविले होते व हे बांधकाम तोडून नवीन बांधकाम करण्यासाठी सांगितले होते. याबाबत बांधकाम विभाग व बांधकाम ठेकेदार या दोघांनीही दुर्लक्ष केल्याने दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी एका पत्राद्वारे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मूल यांना दिनांक ५ जानेवारी २०१८ पर्यंत पूर्तता केली गेली नाही, तर प्रभागातील जनतेला सोबत घेऊन दिनांक ६ जानेवारी २०१८ रोजी झोपाकाढा (ठिय्या) आंदोलन करण्याची सुचना दिली होती. परंतु ही बाब कुणी गांभीर्याने घेतली नाही. विनोद कामडे जनतेला सोबत घेऊन ६ जानेवारी २०१८ रोजी बांधकाम विभाग कार्यालयात पोहचले व अभूतपूर्व आंदोलन सुरु झाले.
     उपविभागीय अभियंता यांनी यावर लवकरच कारवाई करून बांधकाम दुरुस्त करून देण्याची तयारी दर्शवली व तसे लेखी पत्र दिले. ज्याचा जावक क्रमांक आहे १३११/ताशा ६/१/२०१८ तसेच परिणामी हे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. 
     या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे मूल नगर परिषद मध्ये विनोद कामडे हे काँग्रेसचे एकमेव नगरसेवक आहेत व या दोन्ही प्रभाग मिळून भाजपचे ५ नगरसेवक आहेत अशा स्थितीत उर्वरित नगरसेवक मूग गिळून शांत का आहेत ? असा सवाल जनता विचारत आहे. नगरातील बहुसंख्य बांधकाम याच कंत्राटदाराकडे असल्यामुळे बरीच कामे अजूनही अपुर्णावस्थेत आहेत. ती पुर्ण करण्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून भद्रावती मध्