Today : 23:09:2020


दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वाही (अमलनाला पर्यटनचे भुमिपुजन /मात्र पत्राकरांना स्थान नाही)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
महाराष्ट्र शासन पर्यटन व वन विभागाकडून निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे जिल्ह्याची घोडदौड सुरू असून कोरपना तालुका औद्योगिक प्रगती बरोबरच निसर्गाची जोपासना सुद्धा करीत आहे. या भागात जुने एतेहासिक गोंड वंशातील माणिकगड किल्ला हा वैभव असून अंमलनाला प्रकल्पाच्या पायथ्याशी निर्सग पर्यटन क्षेत्र विकासामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी पर्यटकांच्या गरजेचे उत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. या प्रकल्पासाठी वनमंत्र्यांचे सतत मार्गदर्शन लाभले असून शालेय विद्यार्थ्यांना तसेच बाहेरच्या पर्यटकांना उपयुक्त असे हे ठिकाण ठरणार आहे. दोन वर्षात या ठिकानचा चेहरा मोहऱ्यात बदल झाल्याचा दिसेल, अशी ग्वाही देत अत्यंत दुर्गम पकडीगुड्डम निसर्ग पर्यटन, जंगुदेवी पर्यटन क्षेत्र विकासाच्या दुष्टीने शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून याचे नियोजन करण्यात येत असल्याचे मत आमदार अॅड. संजय धोटे यांनी व्यक्त केले. ते अमलनाला पर्यटन विकास भुमिपुजन संमारंभा दरम्यान बोलत होते.
     यावेळी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे, उपाध्यक्षा सौ.आनंदीताई मोरे, ठाणेदार विनोद रोकडेे, भाजप शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, महेश शर्मा, महादेव एकरे, निलेश ताजने, महादेव जयस्वाल, अनंता चटप, पापय्या पोन्नमवार, हरीष घोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवने, वनविभागाचे कर्मचारी, परिसरातील संरपच तसेच नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर समारंभात पत्रकारांना निमंत्रण तर सोडाच बसायला योग्य ते स्थान नसल्याने काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे हे विशेष.संचालन ठेमसकर तर आभार जगनाडे यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


जुन्या बसस्थानकाला तोडणाऱ्यावर कारवाईसाठी साखळी उपोषण सुरु

2018-02-04 | News | Chandrapur