Today : 23:09:2020


विद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

"विद्यार्थ्यांचा सत्कार/ संत जगनाडे महाराज फलकाचे अनावरण"
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
जिवनात संघर्ष केल्या शिवाय व जो पर्यंत काटे टोचनार नाही, तो पर्यंत पुढे जाता येत नाही. काटे टोचल्यावर पाऊले झपाझप पुढें पडतात. तेली समाज शिक्षणात खूप मागे आहे. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका - संघटीत व्हा - संघर्ष करा " हा आदर्श घेत विद्यार्थी जेवढा संघर्ष करेल तेवढा पुढें जाईल असे प्रतिपादन न्यायमूर्ती मुरलीधरराव गिरटकर यांनी केले. ते संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते.
     तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.रामेशजी पिसे जिल्हाध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख अतिथी डॉ.प्रा. नामदेवराव वरभे, प्राचार्या हंसाताई गिरटकर, योगेश समरीत, प्रा. रामनंदेश्वर गीरटकर, विजय बावणे, नोगराज मंगरुळकर, ठाणेदार विनोद रोकडे, सौ.शोभा घोडे, रामदास गिरटकर, किशोर बावणे, गजानन खामानकर आदी उपस्थित होते.
     मुलांच्या चारित्र्याचं गठन करण्याचे काम आई वडीलांचा आहे. मुलांना चारित्र्यवाण बनवायचे असेल तर जिद्द, परीश्रम, चिकाटी असणे महत्त्वाचे. तेली समाजाने अंधश्रद्धेच्या बाहेर पडावे व विज्ञानाचा स्विकार करावा, तेल्यांचा इतिहास विसरता कामा नये, संताजी महाराज सारखे संत लाभले. सफल पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात आहे. अध्यात्मा शिवाय माणुस अंध आहे. तर विज्ञानाशिवाय तो अपंग आहे. असे मत अध्यक्षीय भाषणा दरम्यान रमेशजी पिसे यांनी व्यक्त केले.
     न्यायमूर्ती गिरटकर व त्यांच्या पत्नीचा सपत्निक सत्कार समाजा तर्फे करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, प्रगतिशील शेतकरी, व्यापारी व जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या फलकाचे अनावरण न्यायमूर्ती गिरटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
     कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. राजेश गायधनी, प्रास्ताविक बंडू वैरागडे तर आभार अशोक बावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत वैरागडे, शंकर नागपुरे, विक्रम येरणे, तुषार कलोडे, नरेश शेंडे, राजीव मुळे, सुनील वैरागडे, जनार्धन घटे, बंडू रागीट, नरेश वैरागडे, धनराज पोहाने, गिरिश कामडींनी प्रयत्न केले तसेच बहुसंख्येने तेली समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती.
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..किष्टापूर येथे व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन

2018-02-04 | News | Gadchiroli