Today : 11:07:2020


गडचांदूर ची आरोग्य यंत्रणा कधी सुधरणार

मुमताज अली सैय्यद, कोरपना :-  गडचांदूर येथील ग्रामीण रूग्णालय हे सामान्य लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे सार्वजनिक केंद्र असते. सर्वसामान्य नागरीकांचा दैनंदिन ग्रामीण रूग्णालयाशी संबंध येतो. मात्र गडचांदूर शहरातील ग्रामीण रूग्णालयाला अपवाद ठरत आहे. तज्ञ डाॅक्टरांच्या अभावामूळे गोरगरीब नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने या रूग्णालयाची आरोग्ययंत्रणा कधी सूधरणार अशी विचारणा नागरीक करीत आहे.
     महाराष्ट्र शासन आरोग्य संबंधी गंभीर असून आरोग्य यंत्रणा सुधारण्यास विशेष लक्ष देत असल्याचे दिसत आहे. 'मात्र गडचांदूर ग्रामीण रूग्णालयात अनेक रूग्णांना वेठीस धरले जात आहे. येथील रूग्णालयात बरेच महिन्यापासून तज्ञ डाॅक्टर व इतर पदे रिक्त आहे. केवळ एकच डाॅक्टर भरोषावार सध्या हे रूग्णालय सूरू असून गोरगरीब आदिवासी रुग्णांची योग्य तपासणी होत नाही. 
     मोठ्या प्रमाणात चंद्रपूरला रेफर करण्यात अशी पावती हातात दिली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. यामूळे स्थानिक व परिसरातील तसेच अतिदुर्गम भागातून येणाऱ्या शेकडो रूग्णांना मोठ्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गरोदर महिला, नवजात शिशू, पूरूष तथा जेष्ठ रुग्णांना स्थानिक रूग्णालयातच उपचार मिळावा, रिक्त असलेले तज्ञ डाॅक्टर व परिचारीकांची पदे भरण्यात यावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसा पासून सूरू आहे मात्र याकडे संबंधीत विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे. आणखी किती काळ नरक यातना भोगावी लागेल अशी विचारणा आता नागरीक करीत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्..