Today : 17:02:2020


सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री

प्रतिनिधी, सावली :-  चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री केली जात आहे.  चंद्रपूर चे पोलिस अधिक्षिका, नियती ठाकर रुजु झाल्यानंतर काही प्रमाणात दारू विक्रीला आळा बसला, परंतु चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावरील सावली तालुक्यात अजूनही अवैध दारू विक्री जोमात सुरु आहे. पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा तालुक्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या अवैध व्यावसायिक सोबत असलेल्या मधूर सबंधामुळे मुख्य पुरवठा धारक व स्थानिक पुरवठा धारक यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने अवैध दारू विक्रीला आळा बसणार नसल्याचे चित्र दिसते आहे.
     अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी मुख्य पुरवठा धारक स्थानिक पुरवठा धारका यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु मुख्य व स्थानिक पुरवठा धारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांना तालुक्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे अभय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होताना दिसतो तसेच पोलिस अवैध व्यावसायिक सोबत हित सबंध असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गुप्त माहिती गोळा करून बदली करण्यात यावी असेही सुर निघत आहे आणि मुख्य पुरवठा धारक व स्थानिक पुरवठा धारकावर जास्तीत कठोर कार्यवाही करून आळा घालावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
     काही महिन्या पूर्वी तालुक्यातील पाथरी पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांमध्ये अवैध व्यावसायिक सोबत हित सबंध असल्याने सदर कर्मचाऱ्यांची बदली झाली होती अशी चर्चा रंगली होती. तसेच पोलिस अधिक्षक नियती ठकर मॅडम आणि मुल चे उपविभागीय अधिकारी हिरे साहेबांचे सावली तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन केले होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोल