Today : 27:02:2020


अखिल मादगी समाज सेवा संघटना स्थापन व प्रदेश कार्यकारीणी गठीत

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
गडचांदूर :
महाराष्ट्रातील मादगी समाजाच्या सामाजिक,राजकीय,आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी तथा मादगी समाजाचे सर्वांगीण विकासाचे उदिष्ट समोर ठेवून  एक योग्य व सक्षम संघटन मा.चरणदासजी कोंडावार (निवृत्त नायब तहसिलदार) यांच्या अध्यक्षतेखाली ता.वणी जि.यवतमाळ येथे अखिल मादगी समाज संघटनेची स्थापना करून प्रदेश कार्यकारीणी गठित करण्यात आले. याक्षणी यवतमाळ,चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील मादगी समुदाय बहुसंख्याने उपस्थित होता. समाजात अस्तित्वात असणारे काही संघटनाकडे सत्यात उतरवणारी कृतीक्षमता नसल्याने योग्य नियोजना अभावी अंतर्गत गटबाजी,हेवेदावे,निर्माण झाल्याने आज समाज ख-या अर्थाने विकासापासुन वंचित राहिले आहे.सद्यस्थितीत समाज हिताकरीता मादगी समाज हा संघटित होणे अत्यावश्यक आहे.आपल्या बुद्धीमत्तेचा समाजहिताकरीता कसा उपयोग करता येईल या दृष्टीकोनातून विचार व्हायला हवं म्हणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ,पारदर्शी आणी निस्वार्थपणे झटणारी निष्ठावान कार्यकर्त्याची फळी अखिल मादगी समाज सेवा संघटने अंतर्गत उभारण्याची गरज भासली आहे असे प्रतीपादन अॅड मोरे सरांनी उपस्थित मान्यवरांसोबत संवाद साधताना म्हटले आहे.
     सदर नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीत भगवान गोंटिमुकुलवार प्रदेशाध्यक्ष, प्रा.देवानंद गोरडवार महासचिव, अॅड.रमेश मोरे प्रदेश कार्याध्यक्ष, शाम चिप्पाकुर्तीवार प्रदेशउपाध्यक्ष (चंद्रपुर), केशव लाटीलवार प्रदेश उपाध्यक्ष (गडचिरोली), प्रभाकर लिक्केवार प्रदेशउपाध्यक्ष (यवतमाळ), सोमेश्वर येलचेलवार प्रदेशसचिव, नथ्थुजी नगराळे प्रदेश कोषाध्यक्ष, जगदीश आरमुरवार प्रदेश सहसचिव, डॅनी संड्रावार प्रदेश संघटक, अशोक चेन्नुरवार सहसंघटक, शाम चेन्नुरवार प्रदेश सल्लागार, चरणदास कोंडावार प्रमुख मार्गदर्शक, ऋषी गोरडवार प्रदेश सदस्य, रामदास कुकुडकार प्रदेशसदस्य, दिलीप कर्दलवार प्रदेश सदस्य तसेच प्रदेश प्रवक्ता म्हणुन रमेश मल्लेलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रमोद पुंगुरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नथ्थुजी नगराळे यांनी मानले.
News - Chandrapur | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव