Today : 27:02:2020


प्रधानमंत्री पीक विमा योजना; खरीप हंगामासाठी ६८२ कोटींचे अनुदान

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्य शासनाने खरीप हंगामासाठी ६८२ कोटी २९ लाख ५६ हजार ६९४ रुपये अनुदानाच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्य शासनातर्फे हा निधी विमा कंपन्यांना अग्रीम दिला जाणार आहे. राज्यात खरीप हंगामासाठी दोन विमा कंपन्यांमार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी असून, कंपनीतर्फे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१९ साठी राज्य शासनाला ७०७ कोटी २ लाख ७५,६५८ रुपयांची मागणी केली होती. शासनाने हा निधी अग्रीम द्यावा, अशी मागणी विमा कंपन्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी अनुदानाच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली आहे. कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने हा निधी मंजूर केला आहे.

हे राहतील नियंत्रण अधिकारी

खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी मंजूर अनुदानाचे नियंत्रण अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, कृषी संचालकांना घोषित करण्यात आले आहे. तर संवितरण अधिकारी म्हणून सहायक संचालक (लेखा) महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
News - Mumbai | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिव