Today : 21:09:2019


तिने प्रियकराच्या मदतीने पतीला ठार मारले

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
नवी दिल्ली :
पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं तिच्या मुलीसमोरच पतीची हत्या घडवून आणली. नवी दिल्लीतील समयपूर बदली परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या घटनेचं गूढ उलगडलं. पती सोनूची हत्या झाल्याचा बनाव रचत महिलेनं खुन्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र संशय आल्यानं पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. पतीच्या हत्येचा दावा करणारी महिला तिचा शेजारी सागरच्या सतत संपर्कात होती. विशेष म्हणजे सोनूची हत्या झाल्याची तक्रारदेखील त्याच्या भावानं नोंदवली होती.

त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला

सोनू पत्नी आणि मुलीसह मध्यरात्री झोपायला गेल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. मात्र पतीची हत्या होत असताना आपल्याला कोणताही आवाज ऐकू न आल्याचा दावा पत्नीनं केला. कोणीतरी येऊन पतीची हत्या करुन गेलं, असं महिलेनं पोलिसांना सांगितलं. महिलेच्या दाव्याबद्दल पोलिसांना शंका आल्यानं पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले. त्यामधून महिला शेजारी राहणाऱ्या सागर नावाच्या तरुणाच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. कॉल रेकॉर्ड तपासून पाहिल्यानंतर पोलिसांनी सागरची चौकशी केली. त्यावेळी त्यानं खुनाची कबुली दिली. सोनूच्या पत्नीच्या मदतीनं हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. सागर आणि सोनूच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. काही दिवसातच ते दोघे पळून जाणार होते. त्यामुळेच सोनू झोपल्यानंतर महिलेनं सागरला घरी बोलावलं आणि नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर महिला रात्रभर सोनूच्या मृतदेहाजवळ बसून होती. सकाळी 7 च्या सुमारास तिनं पतीची हत्या झाल्याचं म्हणत आरडाओरडा सुरू केला. मात्र कॉल रेकॉर्ड तपासल्यानं या प्रकरणाचा उलगडा झाला.
News - Delhi | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli