Today : 06:07:2020


महामार्गावर वाहनांनी जागेचा अमरपट्टा बनविल्याचे चित्र, वाहतूक व्यवस्था खोळंबली नागरीकांचा जिव टांगणीला

विदर्भ टाईम्स न्यूज स्पेशल
सैय्यद मूम्ताज़ अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहरात नागरिक सध्या येथील वाहतूक व्यवस्थेमुळे कमालीचे त्रस्त दिसत आहे. महामार्गाच्या अरूंद रस्त्यावर उभी वाहने, तरूण मोटर सायकल स्वार व बस स्थानक परिसरात काळी-पिवळी प्रवासी वाहनांचा हैदोस, यामुळे सर्व सामान्यांचे जिव टांगनीला लागलेले आहे. अगोदरच रेल्वे फाटक ते विर बिरसामुंडा चौका पर्यंत या माहामार्गा वरील रस्त्याची रूंदी अत्यंत कमी आहे. त्यावर अल्पावधीतच पडलेले खड्डे, दिवस भर रस्याच्या कडेला उभी लहान मोठी वाहने तसेच बेलगाम झालेल्या मोटर सायकल स्वार यामुळे महिला, पुरूष, वृद्धांसह शाळकरी विद्यार्थ्यांना जीव  मुठीत घेऊन ये - जा करावे लागत आहे.
     या समस्येला पोलिस विभाग गंभीरतेने घेताना दिसत नसून ठोस पाऊले उचलण्या ऐवजी निव्वळ कारवाईचा भास दाखविला जात असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहे. महामार्गावर उभ्या वाहनांनी जागेचा अमरपट्टाच बनविला कि काय ? अशी शंका व्यक्त होत असुन उभ्या वाहनांचा बंदोबस्त करून महामार्ग खुला करावा अशी मागणी त्रस्त नागरीकांनी केली आहे.
     राजुरा ते गोविंदपुर महामार्गा वरील गडचांदुर मूख्य मार्गाचे काही महिन्यापुर्वी दुभाज व डांबरीकरण करण्यात आले. यामुळे हा रस्ता अरुंद झाल्याचे अनुभवास येत असुन अल्पावधीतच या करोडोंच्या रस्त्यावर खड्डे पडलेले पहायला मिळत आहेे. एक तर रस्ता खड्डेमय, त्यावर कडेला उभी असलेली विविध वाहने यामुळे राहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन अपघाताला चालना मिळत आहे.
     कालच बस स्थानक परिसरात एका मोटार  वाहनाने दुकानाच्या शेडला धडक दिली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. असे लहान मोठे अपघात या महामार्गावर दररोज घडत असुन ठरावा प्रमाणे नगर परिषदेने मूख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला पादचारी रस्ता काढावा, ठाणेदारांनी चौका-चौकात वाहतुक पोलिसांची नेमणूक करावी तसेच रेल्वे फाटक ते बिरसामुंडा चौका पर्यंत दिवस भर उभी असलेली वाहने हटवुन महामार्ग खुला करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघ