Today : 11:07:2020


गडचिरोली व अहेरीत अस्थिव्यंग विद्यार्थीचे शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबीर

विदर्भ टाईम्स न्यूज स्पेशल
दिपक सुनतकर, अहेरी :- राज्य प्रकल्प संचालक म.रा.शि.प.मुंबई यांचे निर्देशा नूसार सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण या उपक्रमा अंतर्गत एस.ए.ए गडचिरोली व्दारा गडचिरोली व अहेरी येथे अस्थिव्यंग व बहूविकलांग विद्यार्थीची शस्त्रक्रियापूर्व मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
      अहेरी उपजिल्हा रुग्णालयात अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी या तालुक्यातील एकुण ११९ विद्यार्थीची तपासणी दि. २३ नोव्हेंबर ला सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत केल्या जाणार आहे. तर गडचिरोली येथील जिल्हा परिषद हाॅस्कूलमध्ये दि. २४ नोव्हेंबर ला सकाळी ११.०० ते ५.०० च वेळेत आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी व गडचिरोली या तालुक्यातील एकुण १३६ विद्यार्थीची तपासणी केली जाणार आहे. अहेरी व गडचिरोली या दोन्ही केंद्रावर एकूण २५५ अस्थिव्यंग व बहूविकलांग प्रकारातील मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
     सर्व शिक्षा अभियान गडचिरोली कडून समावेक्षीत शिक्षण या उपक्रमा अंतर्गत दिव्यांग मुलाचे संपुर्ण जिल्हात घरोघरी जावून सुक्ष्म सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात एकून २५५ विद्यार्थी आढळून आलेत. या सर्व विद्यार्थीची तपासणी बाल अस्थिरोग तज्ञ डाॅ. विरज शिंगाडे, प्रवीरा हाॅस्पीटल नागपूर हे आपल्या टिमसह उपस्थित राहणार आहेत. तरी शस्त्रक्रिया पूर्व तपासनी शिबीरात जास्तीत जास्त विद्यार्थीना उपस्थित ठेवण्याकरीता पालक तथा विषेश तज्ञ विषेश शिक्षकांनी प्रयत्न करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक ओमप्रकाश गुढे यांनी केले आहे. काल दि २० नोव्हे ला ते स्वता अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. कन्ना मडावी यांची भेट घेऊन शिबीराबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख, राजू आक्केवार,गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, विस्तार अधिकारी डोनारकर, भाऊराव हुकरे जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण, विस्तार अधिकारी अजमेरा, लांजेवार आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli