Today : 06:06:2020


आचारसंहितेचे सोशल मीडियावर ही बंधनं !

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असं आवाहन सुनील अरोरा यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या वेळी एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी जारी केला होता. तो विधानसभा निवडणुकीतही लागू होणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी मांडता येणार नाही. 
     मतदानापूर्वी काही तास अगोदर प्रचार थंडावतो. मतदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव असू नये यासाठी हा नियम गेल्या काही निवडणुकांदरम्यान पाळण्यात येत आहे. याच नियमाचा एक भाग म्हणून कुठल्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं पत्र निवडणूक आयोगाने शनिवारी सगळ्या पक्षांना पाठवलं. पूर्वीच्याच नियमाचा हा भाग आहे, हे स्पष्ट करत आयोगाने अशा प्रकारे आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे. आचारसंहिता लागू झाली म्हणजे आता सरकारी कामं बंद होणार, असा समज सर्वसामान्यांचा असतो. पण नक्की काय करण्यावर बंदी आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल.

सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा

तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार. तुम्ही एखाद्या नेत्याचा प्रचार करत असाल, तरीही तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही. तुरुंगवास होऊ शकतो. निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.




News - Mumbai | Posted : 2019-09-21


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli












































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli