Today : 14:08:2020


वनजमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर वनविभागाचा अनाधिकृत बळगा

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
चंद्रपुर :
चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असून जिल्हाभर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास म्हटलं की शेकडो वर्षापासून या जिल्ह्यात राहत असणारा आदिवासी बांधव आपली व आपल्या कुंटुबांची उपजीविका वनजमीनी कसून वर्षानुवर्षे चालवित आहेत. ह्याच जमिनिचे पट्टे मिळावे म्हणून जिल्ह्यातील हजोरो आदिवासी बांधव शेकडो वर्षापूर्वी जिल्हाधिकारी यांचेकडे दावे सादर केले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व वनविभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी वनजमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना शेती करण्यात कोणतीही अडचण व कोणत्याही प्रकारे आडकाठी आणू नये असे सांगितले असतांना सुद्धा वनविभागाकडून नाहक हरकत केल्या जात आहे. आत्तापर्यंत कोणत्याही जिल्हाधिकारी यांनी वनजमीनी कसणाऱ्या आदिवासी बांधवाची दखल घेतली नाही वा त्यांना जमिनीचे पट्टे दिले नाही. ही लाजरवाणी बाब शेकडो वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी बांधवाच्या चंद्रपूर जिल्ह्यात पहायला मिळते आहे. ही बाब कायम असतांना मात्र वनविभागाच्या ताडोबा अंधारी वनक्षेत्रातील डिएफओ महाशय आता मुल, सिंदेवाही, चिमुर या भागात राहुन वनजमीनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांच्या  वनजमीनीत जाऊन बळजबरीने शेतकऱ्यांना मारहाण करुन नाहक शिवीगाळ करुन शेतातून गैरकायदेशीर हुसकावून लावण्याचा मुजोरपणा चालवला असल्याने संतप्त झालेल्या  आदिवासी बांधवाकडून रोष व्यक्त केला जात असून या विरोधात उलगुलान कास्तकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुजोर डिएफओ गुरुप्रसाद यांचेवर कारवाईची मागणी केली आहे. 
     चंद्रपूर, चिमुर, मुल येथील वनजमीनी कसणाऱ्या आदिवासी बांधवाचा वनकायदा २००६ अंतर्गत कायदेशीर हक्क असतांना वनविभागाच्या अशा मुजोर अधिकाऱ्याकडून अनाधिकृतपणे आदिवासी बांधवांना शेती कसण्यापासून हुलकावणे, नाहक शिविगाळ करणे, शेतात बेकायदेशीर बुलडोझर चालवने , व शेतकऱ्या मारहाण करने ही गैरककृत्य डिएफओ गुरुप्रसाद यांचेकडून वारंवार केल्या जात असल्याने पडित शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन त्यांच्या वतीने उलगुलान कास्तकार संघटनेचे सस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन आदिवासी बांधवांना असा नाहक त्रास देणाऱ्या डिएफओ गुरुप्रसाद यांचेवर ताबडतोब कारवाई करुन शेतकऱ्यांना शेती कसण्यास मुभा द्यावी व प्रलंबित असलेले वनहक्क दावे त्वरित निकाली काढावे अशी मागणी केली आहे. वरील रास्त मागणी मान्य न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा उलगुलान कास्तकार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे अँड फरहत बेग ,गुलाब कारमेंगे,शंकर चौधरी,कृष्णा गेजिक, कुडाजी कोटनाके,लक्षण मडावी,रामप्रशांत भाई,कुशाल सोयाम,विठ्ठल कोहपरे, दादाजी शेरकी बंडु रामटेके यांनी दिला असून आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील असा इशारा केला आहे.
News - Chandrapur | Posted : 2020-06-29


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-