Today : 10:04:2020


इमारत अपुरी, आता शाळा कोरपना पंचायत समिती समोर (शैक्षणिक नुकसान पाहुन कढोलीवासी आक्रमक)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने शासन एकिकडे विविध योजना आखत आहे तर दुसरीकडे याला संबंधितांकडून हरताळ फासले जात असल्याचे पहायला मिळत असून कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाया कढोली (खुर्द) येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन ईमारतींचे काम गेल्या तीन वर्षापासुन अर्धवट पडून असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहून गावकरी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
     इमारतींचे अर्धवट काम येत्या १४ डिसेंबर पर्यंत पुर्ण करा अन्यथा १५ डिसेंबर पासुन सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कोरपना पंचायत समिती पुढे शाळा भरविण्याचा इशारा सरपंच व शिक्षण समिती पदाधिकायांसह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांना निवेदना द्वारे दिला आहे.
     जिल्हा परिषद शाळेच्या नविन दोन इमारतीचे काम सर्व शिक्षा अभियान २०११, अणि जिल्हा परिषद (ई.टेंडरींग) अंतर्गत २०१३,१४ पासून अर्धवट परिस्थितीत पडून आहे. यामूळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शिक्षणाचा मोठा नूकसान होत आहे. याविषयी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समीतीचे ठराव संबंधितांना देण्यात आले. दोन्ही सभापतींची प्रत्येक्ष भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली. मात्र दरवेळी आश्वासना शिवाय काहीच पदरी पडले नाही. सात वर्ग असलेल्या या शाळेत चार खोल्या असून खोल्या कमी पडत असल्याने एकच ठिकाणी दोन वर्ग तर काही विद्यार्थ्यांची शाळा झाडा खाली सूरू आहे. वर्ग सात, खोल्या चार, अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. 
     अर्धवट पडलेल्या दोन्ही नविन इमारतीचे उर्वरीत काम येत्या १४ डिसेंबर पर्यंत पुर्ण करा अन्यथा १५ डिसेंबर २०१७, पासून शाळेच्या सर्व मूलांना घेऊन कोरपना पंचायत समिती पूढे शाळा भरविण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur