Today : 04:04:2020


प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार - अॅड. चटप (वेकोलि प्रकल्पगचस्तांचा रस्तारोको, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक)

सैय्यद अमजद अली, गडचांदुर :- वेकोलीत जमिन अधिग्रहित करताना शेतकयात भेदभाव करून त्यांच्यावर अन्याय होत आहे. मात्र या शेतकयांच्या पाठीशी शेतकरी संघटना ठामपणे उभी असून मागण्या पुर्ण न झाल्यास तिव्र असा आंदोलन  छेडण्याचा इशारा विदर्भवादी नेते तथा राजुराचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिला आहे. वेकोली प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय हक्क, योग्य मोबदला आणि नोकरी मिळावी, या मागणी साठी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोवनी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले. 
     राजुरा - कवठाळा मार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखुन धरल्याने शेकडो कोळशाचे वाहन अडकून पडले. शेवटी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक करून पोलिस वाहना द्वारे घेऊन गेले,नंतर रस्ता मोकळा केला.
     गेल्या दिड महिन्या पासून पोवनी २ व ३, खाणीचे प्रकल्पग्रस्त साखळी उपोषण करीत आहे. परंतु त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत वेकोली प्रशासन, राज्य व केंद्र सरकार काहीही बोलायला तयार नाही. त्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देत शेतकरी संघटनेने रस्त रोको आंदोलन केले. पोवनी २ व ३ च्या खाणीचे उदघाटन एकाचवेळी झाले परंतु २, ला जो जमिनीचा दर मिळाला तो देण्यास वेकोलीने राज्य शासनाच्या सुधारीत परिपत्रकाचा आधार घेत नकार दिला. 
     यामुळे येथील शेतकयात संतापाची लाट उसळली दरम्यान काही लोकप्रतिनीधी खोटे आश्वासन देत असल्याने त्यांच्या विषयी अविश्वासाची भावना प्रकल्पग्रस्तात निर्माण झाली आहे. पोवनी २ प्रमाणे ३ ला ही जमिनीचा दर द्यावा कोलगाव, मनोली, सास्ती, भंडागपूर येथील जमिनीचा मोबदला व साखरी येथील उरलेली ३६, शेतकयांची जमिनी अधिग्रहीत करावी, विरूर (गाडेगाव) येथील राहिलेली १७ टक्के जमिन तातडीने अधिग्रहीत करावी, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व विजबील माफ करावे आदिंसह अनेक मागण्यांसाठी हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
     उपविभागिय पोलिस अधिकारी, शेखर देशमुख व ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवले व आंदोलनात प्रभाकर दिवे, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, मधुकर चिंचोलकर, कपिल इद्दे, निळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, स्वप्निल धोटे, दशरथ पाटील तांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला व पुरूष शेतकरी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यतिथी आयोजीत करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक