Today : 10:04:2020


रात्र वैऱ्याची आहे संविधान बदलायचा घाट घातल्या जात आहे (भारतीय संविधान म्हणजे देशाचा आत्मा) - डाॅ. खोब्रागडे

प्रकाश दुर्गे, अहेरी :- "भारतात विविधता आहे या विविधतेत सुध्दा एकता आहे आज भारत देश एकसंघ आहे सर्व जगात भारत देशाला आज जे मानाचे स्थान आहे व देश आज जे विकासाच्या वाटेवर आहे ते केवळ भारतीय संविधानामुळेच या देशात जी लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकुन आहे ते केवळ संविधानामुळेच म्हणून भारतीय संविधान म्हणजे या देशाचा आत्मा आहे." असे मार्गदर्शन आंबेकरी विचारवंत डॉ. नामदेव खोब्रागडे यांनी केले ते धर्मराव  कृषी विद्यालयात ब्लूज युवक संघा तर्फ आयोजित संविधान दिवस कार्यक्रमात बोलत होते.
     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. उदयप्रकाश गलबले हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. नामदेव खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती अॅड संघरत्न कुंभारे, माजी उपसभापती सुखदेव दुर्योधन, ए.आर.खान, प्रकाश दुर्गे, रंगय्या रेपाकवार, प्रतिक मुधोळकर, सोपान कवडे आदिंची होती.
     "रात्र वैऱ्याची आहे संविधान बदलायचा घाट घातल्या जात आहे." सर्व स्तरातील लोकांना एकसंघ ठेवून धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्वावर तसेच समानता, स्वातंत्र्यता, बंधुता, या मुल्यावर  आधारलेल्या बाबासाहेबाच्या संविधानाला पायदळी तुळविल्या जात आहे. शासनात असलेल्या राज्यकर्ते लोकांनी आरक्षनापासून तर नौकऱ्यातील बरत्या थांबविण्यासाठीचा घाट घातला जात आहे म्हणून सर्व भारतीयांनी आता जागरुक होऊन संविधान वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे उपस्थितीतांना मार्गदर्शन डाॅ. खोब्रागडे यांनी केले. 
     याप्रसंगी अॅड. उदयप्रकाश गलबले, अॅड संघरत्न कुंभारे, ए.आर.खान. यांनी भारतीय संविधान या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक सुनतकर यांनी केले. संचालन आनंद अलोने यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार रोशन कुंभारे यांनी माणले या कार्यक्रमाला अहेरी व आलापल्ली येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ब्लूज चे चेतन अलोने, भारत गलबले, शहिद सुनतकर, पृथ्वीराज जुनघरे, प्रफुल्ल दुर्गे, खुशाल डोंगरे व सर्व ब्लूज चे सर्व सभासदांचे सहकार्य मिळाले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव