Today : 03:07:2020


वहानगाव येथील दोन डिपी दहा दिवसापासुन बंद विद्युत विभाग सुस्त असल्याने बंद डिपीने पिक करपण्याची भिती

फिरोज पठाण, चिमूर :- चालु हंगामात चांगला पाऊस पडणार हा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने दुष्काळ परिस्थीती निर्माण झाली असुन चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील अंदाजे सत्तर शेतकरी उपलब्ध साधनांचा वापर करून सिंचण मोटार पंपद्वारे शेती करीत असुन मागील दहा दिवसापासुन शेत शिवारातील दोन इलेक्ट्रीक डिपी बंद असल्याने पिके करपण्याची भिती शेतकऱ्यात निर्माण झाली असुन त्वरीत डिपी चालु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
     चिमूर तालुका सर्वाधिक कोरडवाहु शेती असल्याने सिंचणा करीता विहीर, ओढे, नाले व नदिवर अवलंबुन रहावे लागते. मात्र या वर्षात अत्यल्प पाऊस पडल्याने सिंचणाच्या पाण्याची समस्या भेडसावीत आहे. चिमुर तालुक्यातील वहानगाव येथे मोटार पंप जोडणी करिता दोन डिपी विद्युत विभागाने निर्माण केल्या आहेत. यावर ७० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विज पंपाकरीता जोडणी घेतलेली आहे. अनियमीत विज पुरवठ्याने मोटार जळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक नुकसाणीने विवचणेत आहेत. त्यात भर हंगामामध्ये दहा दिवसापासुन डिपी बंद असल्याने त्यात भर पडली आहे.
     महावितरण विभागाच्या खडसंगी कार्यालयाचे अधिकारी सुट्टीवर असुन त्यांचा प्रभार शंकरपुर येथील अधिकाऱ्यांवर आहे. मात्र कुणीही ताकास तुर लावु देत नाहीत. विज वितरण कर्मचारी अगोदर विज बिल भरा कैपेशिटर लावा नंतरच विज पुरवठा चालु होईल असा दम देत असल्याची शेतकऱ्यांत चर्चा असुन अधिकारी वर्गाचा भ्रमणध्वणी लागत नाही किंवा लागला तरी दाद दिल्या जात नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. 
     शेतात तुर, कपाशी, चणा, वटाना, गहु इत्यादी पिकांना पाण्याची गरज असताना विज कंपनीच्या अडेल वृत्तीने पिक कोमेजुन करपण्याची भिती आहे. त्यामुळे आसमाणी आणि सुलताणी माऱ्यानी शेतकरी हवलदिल झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विजपुरवठा नियमीत करण्याात यावे अशी मागणी केल्या जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्