Today : 14:08:2020


झरी ग्राम पंचायतला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिले शिवसेने ने निवेदन

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर तालुक्यातील खैरी ग्राम पंचायत मधिल गट ग्राम पंचायतमघ्ये झरी, इरवा, पाचगाव दहेगाव समाविष्ठ असल्याने खैरी ग्राम पंचायत हि पाच कि.मी. अंतरावर असल्याने विध्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने खैरी पासून इतर चार गावे विभक्त करून झरी ला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिह वर्मा यांचे नेतृत्वात झरीचे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन दिले आहे.
     खैरी गट ग्रामपंचायत असून यात इरवा, पाचगाव, दहेगाव, झरी चा समावेश असून खैरी पासून इतर हि गावे पाच कि.मी. अंतरावर असल्याने शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, शेतकऱ्यांना विविध कामासाठी त्यांना पाच कि.मी. ची पायपीट करावी लागते तर खैरीची लोकसंख्या एक हजार लोकसंख्या असून त्यातील इतर चार गावाची लोकसंख्या ९८९ लोकसंख्या आहे.
     शासन व प्रशासनाने दखल घेऊन झरी गावला ग्राम पंचायत ला स्वतत्र  दर्जा देण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिह वर्मा यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी महसूल मंत्री पाटील, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बाळूभाऊ धानोरकर यांना निवेदन दिले असून शिष्टमंडळ मध्ये ग्रामपंचायत सदस्य जगदेव गजभे, सुनील लांजेवार, गजानन लांजेवार, खेमराज मेश्राम, गुलाब ननावरे, अभिमान दडमल, सुनील रघुसे, श्रावण गजभे अभिमान शंभरकर आदी उपस्थित होते.
     दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख धर्मसिह वर्मा यांचे नेतृत्वात  झरी येथे बस सेवा सुरू करण्यासंबंधी चे निवेदन बस आगारप्रमुख चिंमुर याना देण्यात आले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून भद्रावती मध्ये गजानन महाराज यां..

<