Today : 04:04:2020


झोपेत असलेल्या मायलेकावर युवकाचा अॅसिड हल्ला

प्रतिनिधी ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चकबोथली येथे एका युवकाने गाढ झोपेत असलेल्या मायलेकावर अँसिडने हल्ला केल्याची घटना दि. २९ नोव्हेंबर च्या पहाटेला घडली. सदर घटनेत महीला व तिचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली असुन पुन्हा एकदा महीलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे.
     सविस्तर माहिती नुसार पिडीत महिला हि आपल्या मुलासोबत झोपली होती. तेव्हा पहाटेच्या सुमारास आरोपीने महिलेच्या घरात प्रवेश करुन साखर झोपेत असलेल्या मायलेकावर अँसिड फेकला. यात दोघेही मायलेक गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर जखमींना त्वरीत ग्रामीण रुग्णाल़य ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. माञ जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा रुग्णाल़य गडचिरोली येथे हलविण्यात आले. 
     सदर घटनेमागील कारण अस्पष्ट असुन पोलिस घटनेमागील कारणाचा शोध घेत आहेत. तपास पुर्ण झाल्यावर घटनेचे खरे कारण समोर येईल. आरोपीचे नाव अमोल चौधरी वय (२३) असुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेतील आरोपीवर भादंवि ३०७, ३२६ (अ), ४५० कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक कडके, ठाकरे, मडावी, नेरलवार, महीला पोलिस शिपाई सुष्मा बारापाञे इ. पोलिस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli