Today : 14:08:2020


शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किशोर नागदेवते यांची बिनविरोध निवड

फिरोज पठाण, चिमूर :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्था चिमुरच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच पार पाडलेल्या निवडणुकीत किशोर काशिनाथ नागदेवते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी गोविंद गोहणे, मानव सचिव कुमारी कल्पना महाकाळकर तर खजिदार पदी गीता ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
     जिल्हा परिषद प्राथमिक सहकारी पतसंस्था चिमूरच्या संचालक मंडळात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य क्रोस्ट्रईब कल्याण महासंघ यांच्या युतीची सत्ता असून तेरा पैकी बारा संचालक युतीचे आहेत. पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या नवीन कार्यकरणीच्या निवडणुकीत कास्ट्राईब महासंघ तालूका शाखा चिमुरचे अध्यक्ष किशोर नागदेवते यांची जिल्हा परिषद सहकारी कर्मचारी पतसंस्था चिमूरच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
     संघटना श्रेणी नारायण कांबळे, ताराचंद दडमल, राज्य सल्लागार एन.जी.तुर्के, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे तालूका अध्यक्ष नरेंद्र मुंगले, कास्ट्राईब संघटनेचे राज्य सहसचिव राजकुमार गेडाम, प्रशांत कोडापे, अनिल गेडाम, यशवंत शंभरकर, प्रदीप गौरकर, प्रल्हाद बोरकर, यांनी नवीन कार्यकरणी साठी योग्य मार्गदर्शन केले.
     कुशल नेतृत्व, मनमिळाऊ, सुस्वभावी, सामाजिकव धार्मिक कामात सदैव सहभागी होणारे किशोर नागदेवते यांची अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दक सर्व संस्थेचे संचालक, माजी अध्यक्ष मधुकर दडमल, तज्ञ संचालक रवींद्र वरखडे, प्रभाकर लोथे, विनायक औतकर, यशवंत सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चव्हाण, विनोद महाजन, महेंद्र लोखंडे, हरिचंद्र कामडी, सुनील केलझरकर व आदींनी अभिनंदन केले.
     या निवडीबद्दल संघटनेचे पदाधिकारी कुमारी प्रज्ञा भित्रे, रसिका जिलटे, संध्या गोंडाने, हरी मेश्राम, हिरालाल बनसोड, सतीश बांगडकर, सुभाष कामडी, प्रा.हुमने, काकाजी वाघमारे यांनी समाधान व्यक्त केले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli