Today : 10:04:2020


नवरगाव तालुका निर्मितीच्या प्रतिक्षेत

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. गावाची लोकसंख्या १५ हजाराच्या घरात आहे. नागभिड, चिमूर, सिंदेवाही या तीन तालुक्याचे विभाजन करून नवरगावजवळ १० कि.मी. अंतरावर असलेल्या गावाचा तालुका निर्मितीत समावेश करून नवरगाव तालुका घोषीत करण्यात यावा अशी मागणी कित्येक वर्षापासून रेटून धरण्यात आली आहे. दिड वर्षा अगोदर मागणीचा पाठपुरावा करित तसे ठराव शासन व प्रशासन स्तरावर पाठविण्यात आले. मात्र आश्वासना शिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे नवरगाव परिसरातील जनता नवरगाव तालुका निर्मितीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
     नवरगाव लगत सिंदेवाही, नागभिड, चिमूर तालुक्याच्या सिमा आहेत. या सिमेलगत असलेल्या गावांचा नवरगावशी संबंध येतो ४० ते ४५ गावांची संख्या होवून ही लोकसंख्या एका लाखाच्या घरात पोहचते. भौगोलिक दृष्टया नवरगाव सक्षम असल्याचे जाणवते. नवरगावला शैक्षणिक, सास्कृतिक वारसा लाभलेला आहे. तसेच विविध शासकीय कार्यालय असलेतरी तालुका निर्मिती अभावी गाव परिसराचा विकास खुंटला आहे. 
     तालुका स्तरावर जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना २० ते २५ कि.मी. ची पायपीट करावी लागते. त्यामुळे नागरिकांना वेळेसोबत आर्थिक भुर्दड सोसावा लागतो आहे. नवरगाव तालुका व्हावा याकरिता विविध संस्था, ग्रामपंचायती व मंडळे यांनी ठराव घेवून तसे ठराव एक वर्षाअगोदर पाठविले आहे. नवरगाव व्यापारी मंडळाने तालुक्याच्या मागणीसाठी विविध राजकीय पुढाऱ्यांना तालुका निर्मितीसाठी निवेदन देवून साकडे घातले आहे. नवरगाव तालुका निर्मितीची घोषणा शासन व प्रशासन स्तरावरून केव्हा ऐकावयास मिळणार याची वाट परिसरातील नागरिक पहात असल्याने नवरगाव तालुका निर्मितीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पहावयास दिसून येत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli