Today : 23:09:2020


विहिरगाव येते नागदिवाळी उत्साहात साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर (नेरी), पंकज रणदिवे  :- 
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या विहिरगाव येथील ग्रामपंचायत भव्य आवारात आदिवासी माना जमात व विद्यार्थी संघटना व नागदीवाळी महोत्सव समिती विहिरगाव यांच्या तर्फे दिनांक २ जानेवारी ते ४ जाने ला माना जमातीचा प्रमुख सन "नागदीवाळी" चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २ जानेवारी ला मुठपुजा कार्यक्रम तसेच परिसर स्वछता रांगोळी स्पर्धा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले आणि सायंकाळी महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले दि ३ जानेवारी ला बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच रात्रो ला कला पथक चा कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक ४ जानेवारी ला सकाळी घरा-घरांसमोर रांगोळी व सजावट करून १० वाजता पूर्ण गांवभर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मधे २ हजारांचे जवळपास स्त्री, पुरुष, व बालकांनी सहभाग दर्शविला. २ वाजता मान्यवारांचे मार्गदर्शन चा कार्यक्रम पार पडले. 
     तसेच कार्यक्रम अध्यक्ष मा रामदासजी जांभुले प्रमुख अतिथी मा. बबनजी गायकवाड, मा शामरावजी धारने, मा श्री केशव घरत सरपंच विहिरगाव, मा परशूराम नन्नावरे, मा कवडुजी नन्नावरे, मा खाटूजी नन्नावरे इत्यादी  मान्यवर उपस्थित होते. यांनी समाज जनजागृतीपर मार्गदर्शन केले मोठया खेळी मेळीच्या वातावरणात हा उत्सव थाटा माठात पार पडला. 
     कार्यक्रमाचे संचालन संजय नन्नावरे सरांनी केले तर प्रास्ताविक श्री महादेव धारने व आभार कु अश्विनी नन्नावरे यांनी केला या कार्यक्रमाला हजारो माना जमात बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी माना जमात मंडळ विद्यार्थी संघटना व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. 
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..नवंतळा येथे विश्वकर्मा जयंती साजरी

2018-02-04 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपुर 
नेरी, पंकज रणदिवे :-
चिमुर तालुक्यातील नेरी